ताजी बातमीराजकारण

BJP-MNS : युतीची घोषणा कधी होणार ? यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणे टाळले

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मनसेचे एंट्री होणार असल्याची चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची मंगळवारी भेट देखील घेतली. तब्बल अर्धा तास दोघांमध्ये युती संदर्भात (BJP MNS Alliance) चर्चा झाली. मात्र युतीची घोषणा कधी होणार ? यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना मोठे वक्तव्य केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरे यांची अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असं वाटतं आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर काहीही स्पष्ट बोलणे टाळले.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली आणि चर्चा केली. शिवसेना फुटून दोन गट पडले तरी मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती कमी झाल्याचं दिसत नाही. भाजपच्या आतापर्यंतच्या अहवालात तेच नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँडच उपयोगी येईल असा कयास भाजपचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार आहेत.

राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा सध्या भाजपकडे आहे, तर शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *