वेलफेयर

मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. सुवर्णा खाडिलकर

आंतरराष्ट्रीय स्तरावत त्यांनी विविध समित्यांवर आणि संपादकीय मंडळांवर काम केले आहे. यामध्ये फिगो (FIGO) समितीच्या ‘वेल वूमन हेल्थ केअर’चा समावेश

 

मुंबई :

२०२४-२५ या वर्षासाठी मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग सोसायटीच्या (एमओजीएस) अध्यक्षपदी डॉ. सुवर्णा खाडिलकर यांनी नियुक्ती झाली आहे. खाडिलकर यांना ३० हून अधिक स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके आणि पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या वक्तृत्त्वाने डॉक्टरांना मार्गदर्शनही केले आहे.

प्रसूती आणि स्त्रीरोग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून डॉ. सुवर्णा खाडिलकर ओळखल्या जातात. खाडिलकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रतिष्ठित संस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्या २०२१-२४ या काळावधीसाठी डॉ. खाडिलकर या फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या उपमहासचिव म्हणून काम करत आहेत. तसेच २०२१-२२ मध्ये त्यांनी एमओजीएसचे सचिव पद भूषवले आह. तसेच २०२२ पासून त्या एमओजीएसच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होत्या. त्यांनी विविध पदांवर काम करताना नेतृत्त्व कौशल्य दाखवत या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी बांधिलकी दर्शविली आहे. तसेच २०२१ पासून त्या जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी ऑफ इंडिया (JOGI) च्या एमेरिटस संपादक होत्या. आता मुख्य संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी १२ पुस्तके संपादित केली असून, १०० हून अधिक प्रकाशने प्रकाशित केली आहेत. त्यांना आजपर्यंत ३० हून अधिक स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके आणि पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपल्या व्याख्याने, भाषणे यांच्याद्वारे प्रभाव टाकला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावत त्यांनी विविध समित्यांवर आणि संपादकीय मंडळांवर काम केले आहे. यामध्ये फिगो (FIGO) समितीच्या ‘वेल वूमन हेल्थ केअर’चा समावेश आहे. तसेच जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी रिसर्च (JOGR) आणि एशिया आणि ओशनिया फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी (AOFOG) या संपादकीय मंडळांचा समावेश आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ वेल्स येथे एंडोक्रिनोलॉजी हा विषय शिकवून त्यांची शिक्षणाप्रती बांधिलकी दिसून येते. डॉ. खाडिलकर या क्षेत्राप्रती असलेले समर्पण आणि त्यांच्या प्रभावी कार्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसूती आणि स्त्रीरोग शास्त्रात एक आदरणीय व्यक्ती बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *