ताजी बातमी

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्याने मोबाईल हिसकावला ; चोरास पकडले

डोंबिवली एमआयडीसी विभागातील नागरिक मॉर्निंग वोंकसाठी अनेक नागरिक येत असतात. या लोकांना टार्गेट करत चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवरे यांना थांबविले

डोंबिवली ( शंकर जाधव )

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्ध नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडून चोप दिला.ही घटना मंगळवार 23 तारखेला डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद मन्नान गुलाम नबी शेख असे या चोरट्याच्या नाव असून तो मुंब्रा येथे राहणार आहे.तर संदीप देवरे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
डोंबिवली एमआयडीसी विभागातील नागरिक मॉर्निंग वोंकसाठी अनेक नागरिक येत असतात. या लोकांना टार्गेट करत चोरट्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवरे यांना थांबविले. देवरे यांनी पत्ता सांगत असताना चोरट्याने मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला.देवरे यांनी आरडाओरड केला असता नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करून पकडले. नागरिकांनी चोरट्याला चोप दिला असता त्याने देवरे यांचा मोबाईल दिला.चोरट्याकडे धारदार शस्त्रही सापडले होते. नागरिकांनी चोरट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरटा साथीदारासोबत मोटरसायकलीवरून आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *