ताजी बातमी

डोंबिवलीकरांसाठी यंदा भव्य गुढीपाडवा सोहळा

रामराज्य व मानवी मुलभूत मुल्ये या संकल्पनेवर सर्व डोंबिवलीकर संस्थांनी विविध चित्ररथ तसेच वैविध्यपूर्ण स्वरूपाने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

डोंबिवली ( शंकर जाधव )

गुढीपाडवा निमित्त डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थेच्यावतीने पूर्वेकडील अप्पा दातार चौकात स्वागतयात्रा काढली जाते. यंदाचे २६ वे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे 9 तारखेला स्वागतयात्रा गणेशाची पालखी, ढोल-ताशा पथके, सायकल-बाईक रॅली, विविध चित्ररथ, प्रात्याक्षिके, पारंपारिक पोषाखातील डोंबिवलीकरांचा सहभाग होणार आहे. संस्थानाचे अकरा विश्वस्त व पंधरा स्वागत यात्रा संयोजन समिती सदस्यांच्या नेतृत्वाखाली नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे.

यंदा रामराज्य व मानवी मुलभूत मुल्ये या संकल्पनेवर सर्व डोंबिवलीकर संस्थांनी विविध चित्ररथ तसेच वैविध्यपूर्ण स्वरूपाने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन यानिमित्ताने स्वागत यात्रा प्रमुख दत्ताराम मोंडे यांनी केले. यात्रेमध्ये मराठी सिने कलाकारांची मांदियाळी डोंबिवलीकरांना अनुभवायला मिळणार आहे. यंदा यात्रेसाठी सुप्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. उज्ज्वल निकम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. गणेश मंदिर येथे ४ दिवस आधी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची अनुभूती सर्वांना घेता येणार आहे. श्रीगणेश मंदिर संस्थानने अनेक समाज उपयोगी उपक्रम आयोजित केले आहेत. स्वागतयात्रेनिमित्त सर्व डोंबिवलीकर एकत्र येतात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात याच लोकशक्तीचा वापर करून समाज उपयोगी कार्यासाठी नवीन उपक्रम करण्याचा विषय या सभेनिमित्त प्रस्तुत आला. संस्थानाचे उपाध्यक्ष सुहास आंबेकर, कार्यवाह प्रवीण दुधे, सहकार्यवाह डॉ.उत्कर्ष भिंगारे, खजिनदार राजय कानिटकर, विश्वस्त राहुल दामले, श्रीपाद कुळकर्णी, संयोजन समिती प्रमुख दत्ताराम मोंडे व इतर समिती सदस्य यांसह सर्व संस्थांचे मिळून ११० सभासद आहेत.
यंदा डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे 100 वे वर्ष असून स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष आहे. गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतुन रोवली गेली त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झाली .डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते. डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. 9 एप्रिल रोजी गुढि पाडव्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभा यात्रा निघणार आहे .यंदा स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष आहे .स्वागतयात्रेच्या निमित्ताने गीता पठण ,महिला पुरुषांसाठी भजन स्पर्धा ,महिलांसाठी फ्लॉवर डेकोरेशन ,ज्येष्ठ नागरिकांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . 6 एप्रिल पासून कार्यक्रम सुरू होणार असून श्रीसूक्त पठण, दीपोत्सव, 7 एप्रिल रोजी श्रीगणपती अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी बाईक रॅली, श्री गणपती अथर्वशीर्ष पठण तसेच संस्कारभारती तर्फे महारांगोळी, 8 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन त्यानंतर दिलखुलास उज्वल निकम या विषयावर ज्येष्ठ विधितज्ञ एड उज्वल निकम यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे घेणार आहेत. यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या संस्थांना रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये ही संकल्पना असणार आहे. 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी साडे पाच वाजता श्री गणरायाची महापूजा व पालखीपूजन होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *