ताजी बातमी

Eknath Shinde : शिवसेनेच्या शिंदे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर ; श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही

कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितलेला आहे

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) 2024साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची (Shiv Sena) उमेदवारी यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आठ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या यादीनुसार मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला असून, विद्यामान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शिवसेना शिंदे गटाने पहिली यादी जाहीर करताना त्यांच्या सर्व विद्यमान खासदारांची नावे मात्र जाहीर केलेली नाही. रामटेकमधून शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले आहे. या मतदारसंघात त्यांनी काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या हाती धनुष्यबाण दिला आहे. शिवसेनेचे कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे आणि कल्याण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले आहेत. यापैकी ठाण्यातील खासदार राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. ठाकरे गटाने त्यांना पुन्हा उमेदवारी देखील जाहीर केली आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा सांगितलेला आहे. या जागेबद्दल सुरु असलेला वाद अजून मिटलेला नाही असेच शिवसेनेच्या पहिल्या यादीवरुन दिसत आहे.

मावळ- श्रीरंग बारणे
रामटेक- राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
कोल्हापूर- संजय मंडलिक
हिंगोली – हेमंत पाटील
बुलढाणा – प्रतापराव जाधव
शिर्डी – सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *