राजकारण

आयुक्तांच्या बदलीबाबत सस्पेन्स; अश्विनी भिडे मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक

अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या बदलीची ऑर्डर राज्य सरकारने काढली

केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पी वेलरासू यांची अद्याप दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांच्या बदलीबाबत रात्री उशिरापर्यंत सस्पेन्स कायम होता.
मुंबई महापालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांच्यासह पूर्व उपनगरच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व पी वेलरासू (प्रकल्प) यांची बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीचे कारण ते बदलीतून आयुक्त यांचे नाव वगळावे अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. मात्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारची विनंती फेटाळत मंगळवारी सायंकाळपर्यंत आयुक्त व दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांची बदली करावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या बदलीची ऑर्डर राज्य सरकारने काढली आहे. मात्र पालिका आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांच्या बदलीबाबत रात्री उशिरापर्यंत सस्पेन्स कायम होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *