राजकारण

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित

मुंबई :

मुंबई दक्षिण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवडी आणि भायखळा विभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच ठिकठिकाणी महिलांनी पुढे येऊन त्यांचे औक्षण केले तर सार्वजनिक मंडळांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवडी विभागात सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठीकठिकाणी आमदार यामिनी जाधव यांचे महिलांनी औक्षण केले. अनेक इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित होते.

त्याचप्रमाणे भायखळा विभागात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महायुतीतील नेते मिलिंद देवरा, रोहिदास लोखंडे, मनसेचे संजय नाईक आणि शलाका हरयान आदी महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेतले. अफाट गर्दी , लोकांच्या उत्साहात झालेल्या या रॅलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामिनी जाधव यांचे स्वागत केले. आमदार यामिनी जाधव आल्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी यामिनी जाधव यांना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मंडळांनी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक व्यक्तीचा आशावादी चेहेरा आणखी ताकदीने लढायला संघर्ष करायला ऊर्जा देत आहे, बळ देत असल्याचे यावेळी यामिनी जाधव यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *