ताजी बातमीराजकारण

Raj Thackrey : जागावाटपाच्या चर्चेत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या जागावाटपाच्या चर्चेत आता अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मनसे आणि भाजप युतीला वेग आला आहे. राज ठाकरे (Raj Thackrey) आज दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्याला निघाले आहेत. दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरु आहेत. या संदर्भातील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बातचित होऊ शकते. ही बातचित सकारात्मक ठरली तर मनसेला लोकसभेसाठी किती जागा सोडण्यात येतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी याआधीच आपण यापुढे सत्तेत असू असे संकेत देण्यात आले आहेत. त्यानंतर सातत्याने राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

राज ठाकरे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत. ते महायुतीत आल्यास आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना दिली. तसेच मनसे महायुतीसोबत येण्याबद्दल लवकरच योग्य तो निर्णय होईल, असे सूचक विधान काही वेळापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *