ताजी बातमीमनोरंजन

Elvish Yadav : … या प्रकरणात एल्विशच्या अडचणी वाढणार

सापाच्या विष प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या राहुलसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये भेटला होता

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि युट्यूबर एल्विश यादवला (Elvish Yadav) नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक वाद विवादामध्ये सापडलेला एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणात अडचणीत आला आणि या प्रकरणात एल्विशच्या अडचणी वाढणार आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर पोलिसांनी NDPS प्रकरणात बिग बॉस विजेता एल्विश यादवची चौकशी केली आहे. एल्विशने आपल्यावरील आरोपांबाबत सत्य सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. नोएडा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विशने कबूल केले आहे की तो पार्टीसाठी साप आणि सापाचे विष मागवत असे.

चौकशीदरम्यान, एल्विश यादवने कबूल केले की तो सापाच्या विष प्रकरणात नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेल्या राहुलसह सर्व आरोपींना वेगवेगळ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये भेटला होता आणि त्यांच्याशी ओळखही होती, त्याच्या संपर्कातही होते. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादववर २९ एनडीपीएस कायदा लावला आहे. 29 एनडीपीएस कायदा लागू केला जातो जेव्हा एखादी व्यक्ती अंमली पदार्थांशी संबंधित कटात सामील असते. अशा परिस्थितीत त्याला शिक्षा झाल्यास एल्विसच्या अडचणी वाढतील. या कायद्यांतर्गत आरोपींना सहजासहजी जामीन मिळत नाही.

वास्तविक, ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडली होती जेव्हा मेनका गांधी यांच्या पीपल्स फॉर ॲनिमल्स या संस्थेचे सदस्य गौरव गुप्ता यांनी नोएडामधील पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून ड्रग्ज विभाग आणि वन विभागाच्या पथकाने नोएडा सेक्टर ५१ येथील गेस्ट हाऊसवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी रेव्ह पार्टीतील काही लोकांना अटक केली होती, त्यांच्यासोबत पाच प्रजातींचे ९ साप आढळून आले होते आणि विषही आढळले होते. या लोकांच्या चौकशीच्या आधारेच एल्विश यादवचे नाव समोर आले. त्यानंतर त्याला आरोपी बनवण्यात आले. जरी एल्विशने सुरुवातीला सर्व आरोप फेटाळले होते. रविवारी सेक्टर 135 पोलिसांनी एल्विशला याच प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चौकशीदरम्यान त्यांची अनेक विधाने परस्परविरोधी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय तो पोलिसांना सहकार्य करत नव्हता, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

यानंतर पोलिसांनी दीर्घ काळ चौकशी केली. त्यावेळी तपासानंतर सापांच्या विषाची चाचणी करण्यासाठी जयपूर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) मध्ये पाठवले. त्यावेळी 16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या त्या अहवालात रेव्ह पार्टीमध्ये कोब्रा-क्रेट प्रजातीच्या सापांचे विष पुरवण्यात आल्याचे उघड झालं. त्यानंतर नोएडा सेक्टर 49 मध्ये एल्विशसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *