ताजी बातमी

Mumbai : BMC अधिकारी वडापावची गाडी उभी करू देत नसल्याने मंत्रालयाच्या इमारतीवरून मारली उडी

अनेकांनी मंत्रालय मुंबईतून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अनेकांनी मंत्रालयातून उडी मारूनही जीवन संपवले आहे. त्यामुळे मंत्रालयात जाळी लावण्यात आली

आज मंत्रालयातून (Mumbai) एक मोठी बातमी समोर आली आहे. BMC अधिकारी वडापावची गाडी उभी करू देत नसल्याने . दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. सदर व्यक्ती त्या जाळ्यात पडली असून त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. अरविंद बंगेरा असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव असून तो बोरिवलीचा रहिवासी आहे. पालिकेचे अधिकारी त्रास देत असल्याने हे कृत्य केल्याचे बंगेरा यांनी सांगितले.

अनेकांनी मंत्रालय मुंबईतून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. शिवाय अनेकांनी मंत्रालयातून उडी मारूनही जीवन संपवले आहे. त्यामुळे मंत्रालयात जाळी लावण्यात आली आहे. जेणेकरून असे प्रकार टळतील. मात्र, जाळी बसवूनही अनेकांनी अशाच प्रकारे उडी मारून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये वर्ध्यातील धरणग्रस्तांनी याच जाळीवर उडी मारून निषेध केला. यावेळी सहा नागरिकांनी या नेटवर उड्या घेतल्या होत्या. आमच्या मागण्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या नागरिकांनी उडी घेतली. अनेक नागरिक, आंदोलक सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयात जातात. अचानक ते आंदोलन करू लागतात. घोषणाबाजीही करताना आढळतात. तसेच अनेकांनी मंत्रालयात जाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे मंत्रालयात प्रवेशावर राज्य सरकारने बंदी घातली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये सरकारने या संदर्भात नियमावली जाहीर केली होती. प्रत्येक मजल्यासाठी स्वतंत्र पास जारी केला जाईल. तसेच मंत्रालयात प्रवेश करताना 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख बाळगता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *