ताजी बातमी

Kalyan : संतापलेल्या व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला…

वाहन उचलताना वाहनचालक आला असता त्याला वाहन दिले नसल्याने त्याने त्याने चक्क टोइंग व्हॅनखाली झोपून दुचाकी

डोंबिवली ( शंकर जाधव )

नो पार्किंग मध्ये उभी केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्याआधी टोइंग व्हॅनमधून अनाऊमेंट करणे आवश्यक असून त्याठिकाणी वाहनचालक आल्यास ती गाडी उचलू शकत नाही. मात्र वाहन उचलताना वाहनचालक आला असता त्याला वाहन दिले नसल्याने त्याने त्याने चक्क टोइंग व्हॅनखाली झोपून दुचाकी सोडवली.हा प्रकार गुरुवार 21 तारखेला कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडली.

वाहतूक पोलिसांनी दुचाकी टोइंग केल्याने संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केला होता.ही घटना एका नागरिकाने आपल्या मोबाईलमधून कैद केली होती. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.गाडी टोइंग केल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपुन या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला.शेवटी गाडी पुढे काढण्यासाठी वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग राहिला नसल्याने त्यांनी त्या व्यक्तीची टोइंग केलेली गाडी सोडून दिली.त्यानंतर तो झोपलेला व्यक्ती गाडी समोर बाजूला झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *