ताजी बातमी

सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला मोठी सूज आल्याने त्यांच्यावर शस्रक्रिया

दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांनी सद्गुरूंची तपासणी केली. त्यानंतर एमआरआय काढण्यात आला या मध्ये सद्गुरूंच्या मेंदूवर मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आणि ईश्वर फाउंडेशनच्या (Isha Foundation) संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव (Jaggi Vasudev Sadhguru) यांच्यावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरु यांच्या मेंदूला मोठी सूज आली होती. सध्या सद्गुरु यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे.

सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला मोठी सूज आल्याने त्यांच्यावर शस्रक्रिया झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं समोर आलं आहे. सदगुरू जग्गी वासुदेव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. मेंदूला सूज आल्याने त्यांच्यावर इमर्जन्सी ब्रेन सर्जरी करण्यात आल्याची माहिती आहे.

दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांनी सद्गुरूंची तपासणी केली. त्यानंतर एमआरआय काढण्यात आला या मध्ये सद्गुरूंच्या मेंदूवर मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार आठवड्यांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास होत होता. डोकेदुखी खूप होत असल्याने 15 मार्च हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. दुपारी 4 वाजता मी त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला, परंतु संध्याकाळी 6 वाजता त्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक होती. ती रद्द करण्याचे त्यांची इच्छा नव्हती. तथापि, एमआरआय करण्यात आला. नंतर, आणि MRI ने दाखवले की त्याच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. तो मेंदूच्या बाहेर आणि हाडांच्या खाली आहे. दोन वेळा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता असे डॉ. सुरी म्हणाले.

मेंदूला मोठी सूज आणि रक्तस्त्राव झाल्यानंतर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूला सूज आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर तात्काळ आपात्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *