खेळ

IPL 2024 : काय ? मुंबईच्या पहिल्याच सामन्यात हा मुख्य खेळाडू नाही ?

मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा पहिलाच सामना असेल. यंदा मुंबई इंडियन्स नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मात्र त्याआधीच

आयपीएलचा 17वा (IPL 2024) हंगाम सुरु व्हायला अवघे काही तास उरले आहेत. २२ मार्च पासून आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. सीझनचा पहिला हिट सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 मार्च रोजी होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्सचा होणार आहे. मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा पहिलाच सामना असेल. यंदा मुंबई इंडियन्स नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मात्र त्याआधीच कर्णधार हार्दिकची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला पहिल्या सामन्यात सूर्याशिवायच उतरावे लागू शकते.

आता जर सूर्यकुमार यादव संघाबाहेर झाला तर त्याच्या जागी कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. हार्दिकने गेल्या 2 हंगामात गुजरात टायटन्ससाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. हार्दिक हा गुजरातच्या फलंदाजीचा कणा होता. दुखापतीतून सूर्या पूर्णपणे सावरला नसल्यामुळे हार्दिकला जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे हार्दिकला कर्णधारपदासह अधिक जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे.

सूर्याऐवजी कोणाला संधी आहे?
आता सूर्याऐवजी नेहल वढेरा किंवा विष्णू विनोद यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. नेहल वढेराला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण, नेहल डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. गरजेच्या क्षणी तो गोलंदाजीही करू शकतो. रोहित शर्मा आणि इशान किशन ही जोडी संघासाठी सलामीला येतील.

मुंबईचे प्लेइंग इलेव्हन कसे असेल ?

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, आकाश मधवाल, नुवान तुषारा आणि जसप्रीत बुमराह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *