ताजी बातमी

Dombivli : भाजपचा शरद पवार गटाला डोंबिवलीत धक्का…

लोकसभा निवडणूक काळात झालेली ही इनकमिंग महत्वाची असून आता अशाच इनकमिंग सुरूच होत राहणार असा विश्वास

शंकर जाधव

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर निवडणुकीला अवघे काही दिवसच उडले असताना डोंबिवलीतील (Dombivli) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar) पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) मध्ये प्रवेश केला.

शरद पवार गट युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण ग्रामीण सरचिटणीस योगेश डांगे, उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह डोंबिवली भाजप पूर्व मंडल कार्यालयात भाजपा नेत शशिकांत कांबळे,नंदकिशोर परब, मुकुंद (विशू) पेडणेकर,सचिन म्हात्रे आदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणूक काळात झालेली ही इनकमिंग महत्वाची असून आता अशाच इनकमिंग सुरूच होत राहणार असा विश्वास भाजपा नेते व्यक्त करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन भाजपात त्यांच्या प्रवेश केला असे हे पदाधिकारी सांगत आहेत. या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश करण्यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडल सरचिटणीस मितेश पेणकर यांचा मोठा वाटा आहे. भाजपात ज्या प्रकारे युवकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास काम होत असल्याने नवीन युवक भाजपा येण्यास इच्छुक असतात असेही एका भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी प्रकाश (बाळा) पवार, संजीव बिडवाडकर, सचिन म्हात्रे, रविसिंग ठाकूर, धनाजी पाटील, रामचंद्रजी माने, पूनम पाटील, अथर्व कांबळे, अंकित रयानी, रुपेश पवार, दीपक त्रिपाठी, शरद जैन व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. तरूण फळीतील कार्यकर्त्यांनी पक्षांतर केल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्काच आहे अशी चर्चा शहरात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *