सरपंचाची रुग्णाप्रति आत्मीयता ; टँकरने पाणी पुरवठा
गेल्या काही दिवसांपासून जव्हार शहराला होणारा पाणीपुरवठा काही तांत्रिक अडचणीमुळे बाधित झाला होता, त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याची तीव्र समस्या जाणवत होती
संदीप साळवे – पालघर
पालघर:जव्हार तालुक्यातील रुग्णांना उपचाराकरिता येथील पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयात यावे लागते, उपब्ध साधन सामग्री, मनुष्य बळाच्या तुलनेत रुग्ण संख्या अधिक असते, त्यामुळे बऱ्याच समस्या उद्भवत असतात, त्यात पाणी समस्या पाचवीला पुजलेली आहे.दरम्यान, कासट वाडी ग्रामपंचायत चे सरपंच कल्पेश विनायक राऊत हे येथील रुग्णालयात डायलेसिस सुविधा केंद्र बाबत सुधारणा व्हावी अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांना अनेक रुग्ण व नातेवाईकांनी भेटून पाणी समस्येबाबत गाऱ्हाणी मांडल्या, राऊत पुढे गले असता रक्तपेढी येथे देखील पाणी समस्या भीषण आहे. हे लक्षात आले असता त्यांनी तात्काळ आपल्या पदरमोड खर्चाने पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे व्यवस्था करून रुग्णाप्रति आत्मीयता दाखविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जव्हार शहराला होणारा पाणीपुरवठा काही तांत्रिक अडचणीमुळे बाधित झाला होता, त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याची तीव्र समस्या जाणवत होती, यात जव्हार रुग्णालयात पाण्याची तीव्रता अधिकच भीषण होती, ही बाब राऊत यांनी लक्ष्यात घेत तात्काळ नगर परिषद प्रशासनाला पाणी पुरवठा करण्याची विनंती केली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते ओमकार कूवरा, राहुल शेंडे, कासटवाडी ग्राम उपसरपंच त्रिंबक रावते, सदस्य कुणाल सापटा आदी उपस्थित होते.