अंतरंगात दडलेल्या बौद्धिक व सुप्त कला शक्तीचा शोध घेवून स्वतःची उन्नती करा
प्राचीन आदिवासी संस्कृती व आयुर्वेदाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे या करिता या शाळेचे मुख्याध्यापक अवधूत गावड यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे नियोजन
नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे हे प्रत्येक स्पर्धेचे वैशिष्ट्य समजले जाते अशातच, गोखले एज्युकेशन सोसायटीचे,के.व्ही.हायस्कूल व आर. वाय. जुनियर कॉलेज,जव्हार येथे नुकताच रानभाजी व वनौषधी वनस्पती प्रदर्शन व स्पर्धा पार पडली. प्राचीन आदिवासी संस्कृती व आयुर्वेदाचे महत्त्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे या करिता या शाळेचे मुख्याध्यापक अवधूत गावड यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदिवासी सेवक वसंत भसरा यांच्या हस्ते रानभाजी व वनौषधी प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष भसरा व प्राचार्य अवधूत गावड यांनी विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध रानभाज्या व वनौषधीचे कुतुहलाने निरीक्षण करून अनेक दुर्मिळ रानभाज्या व वनौषधीविषयी माहिती जाणून घेतली .या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम दाते , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पांडूरंग मौळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या वैशाली कान्हात , पालक शिक्षक संघ सहसचिव प्रीती पाटील पालक प्रतिनिधी, मृणाल बोराडे , पर्यवेक्षक महाले आदी उपस्थित होते.
इ.५वी ते ७वी, इ. ८वी ते इ .१०वी आणि ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या रानभाज्या तसेच वनौषधी यांचे परीक्षण करून गुणदान केले . प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले . याप्रसंगी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला.
अभ्यासातून करिअर” कडे या मार्गदर्शन शिबिर, १२०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
विद्यार्थ्यांनी अंतरंगात दडलेल्या बौद्धिक व सुप्त कला शक्तीचा शोध घेवून स्वतःची उन्नती करा असा सल्ला भसरा यांनी आपल्या भाषणातून दिला. शाळा आपल्यातील कला गुणांचा विकास करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे त्याचा फायदा घेवून अष्टपैलू व्यक्तिमत्व बनण्यासाठी मेहनत घ्या असे आवाहन केले. तर मुख्याध्यापक गावड यांनी विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांविषयी अधिक माहिती देत दुर्मिळ होत असलेल्या रानभाज्या व वनौषधीची जुन्या जाणत्या मंडळींकडून माहिती घ्यावी व संकलित करावी व आपल्या घरी आजीबाईचा बटवा समृध्द करा अशी सूचना केली. विशेष आकर्षण म्हणून या प्रदर्शनात चित्रकला शिक्षक रविंद्र खाटेकर व विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वारली चित्रकलेचे दालनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रानभाज्या व वनौषधी महोत्सवाचा निकाल जाहीर करण्यात आला त्यात प्राथमिक गटात प्रथम क्रमांक दिमानी खानझोडे ५ वी अ ग्रुप , द्वितीय क्रमांक साक्षी वाजे ७ वी अ ग्रुप, तृतीय क्रमांक युवराज नेर्ले ६ वी अ ग्रुप , माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक सम्राट साळवे ८वी अ ग्रुप , द्वितीय क्रमांक केतन तपासे १०वी ब ग्रुप , तृतीय क्रमांक हिमानी डोके १०वी अ ग्रुप ,ज्युनिअर कॉलेज गटात प्रथम क्रमांक हेमांगी भोये १२ वी अ ग्रुप , द्वितीय क्रमांक स्नेहा डोके ११ वी कॉमर्स ग्रुप व तृतीय क्रमांक क्रमांक साक्षी भांगरे १२ वी अ ग्रुप विजयी ठरले. पालकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे महोत्सवाचा आनंद व अनुभव व्दिगुणित झाला .महोत्सवाचा समारोप विद्यार्थ्यांनी आदिवासी तारपा नृत्य , गौरी नृत्य व सांबळ वाद्यावर नृत्य सादर करून केला .