डोंबिवली

शास्त्रीनगर रुग्णालयाला डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने अद्ययावत एक्सरे मशीन भेट

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण -डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, रुग्णालयातील डॉक्टर वर्ग, इतर मान्यवर उपस्थित होते.

डोंबिवली ( शंकर जाधव )

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीकर प्रतिष्ठान यांच्या वतीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाला अद्ययावत एक्सरे मशीन भेट देण्यात आली. या एक्स-रे मशीनचे शुक्रवार 20 तारखेला लोकार्पण करण्यात आले. या मशीनमुळे डोंबिवलीतील गरजू रुग्णांना खूप मोठा लाभ होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण -डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, रुग्णालयातील डॉक्टर वर्ग, इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *