डोंबिवली

डोंबिवलीत ‘त्या’ बॅनरची कल्याण ग्रामीण भागात चर्चा

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ भाजपाकडे असावा अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.

डोंबिवली ( शंकर जाधव )

आगामी विधानसभा निवडणुकित आपल्या पक्षातील पदाधिकारी निवडून आल्यास मतदार संघाचा विकास होईल असे म्हणत भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण जिल्हासरचिटणीस नंदू परब यांना शुभेच्छा देत ‘ तू फक्त लढ आम्ही सोबत आहोत’ असे बॅनर लावले. या बॅनरची कल्याण ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) यांची महायुती आहे. सत्तेत असलेल्या महायुतीने अनेक विकासाची कामे केल्याने जनतेचा कौल पुन्हा महायुतीलाच जाईल अशी चर्चा रंगली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ भाजपाकडे असावा अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांची उत्तम पकड आहे. दांडगा जनसंपर्क असल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी परब यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. या मतदार संघात भाजपाकडून परब यांना उमेदवारी मिळाल्यास मतदार संघाचा कायापालट होईल आणि विकास होईल असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील इच्छुकांनी याच मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसते. आता महायुती असल्याने कल्याण ग्रामीण मतदार संघ भाजपाकडे जाईल का शिवसेना ( शिंदे गट ), कडे जाईल हे पक्षश्रेष्टी ठरवतील.दोन्ही पक्षाकडून उमेदवारीची रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत असले तरी उमेदवारीची माळ कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल हे लवकर दिसेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *