जव्हार नगर परिषदेमार्फत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” उपक्रम
स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी सन २०१७ पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे
जव्हार:
राष्ट्रपिता महात्मा गाधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी म्हणून, स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी सन २०१७ पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा साजरा केला जात आहे. दरम्यान, या उपक्रमांतर्गत जव्हार शहरात नगर परिषदेच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे “एक पेड माँ के नाम”अंतर्गत वृक्षारोपण करणेत आले. तसेच बुधवारी जव्हार शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या सनसेट पॉईंट येथे स्वच्छता मोहिम राबविणेत आली.
१४ सप्टेंबर ते दि. १ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” हे अभियान जव्हार नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार शहरात राबविण्यात येत आहे.