Dombivli : आनंदनगर मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक संदेश
णेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर ,स्पर्धा लहान मुलांसाठी कार्यक्रम, भजन,कीर्तन आयोजित केले जाते
डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली पश्चिमेकडील ‘मोरया माझा आनंद नगरचा राजा’ आनंदनगर मित्र मंडळाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे २६ वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष सूरज पवार म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सर्वांना एकत्र आणण्याकरता आणि सामाजिक संदेश देण्याकरता सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता.गणेशोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि उत्सव गणरायाची पूजा करतात.समाजात समतोल राहावा आणि एकी राहावी, समाजात बांधिलकी राहावी यासाठी आमच्या मंडळाचे प्रयत्न असतात. गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर ,स्पर्धा लहान मुलांसाठी कार्यक्रम, भजन,कीर्तन आयोजित केले जाते.
गणेशमूर्तीचे योग्य प्रकारे विसर्जन करणे महत्त्वाचे असते. या विधीचे काही महत्त्वाचे टप्पे
सत्यनारायण पूजा ठेवत असून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.महाराष्ट्रात दुष्काळ नको, महिलांवरील अत्याचार नको, बदलते राजकारण नको अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली.तर मंडळाचे सचिव विकी हिंगे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्वजाती धर्माचे लोक एकत्र येत असतात असे सांगितले. मंडळाचे अध्यक्ष सूरज पवार, उपाध्यक्ष समीर भोईर,सचिव विकी हिंगे, सागर साळवे,खजिनदार जेलिन शाह, ओंकार कळे, कार्याध्यक्ष अमित सुरडकर , माजी खजिनदार रौनक राजदे,यांसह राज म्हात्रे, ओंकार शेळके,शंतनु कदम, रजनीश माळी, सुमित सिंग, सुशांत म्हात्रे, उमेश ठाकूर, निकीत पोवळे, योगेश उघाडे, अक्षय चौहान, भरत सोंगार, अजय कोटक, राहुल वर्मा, मयूर चांदोरा यांसह मंडळाचे अनेककार्यकर्ते अथक मेहनत घेत असतात.