Kalyan : शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर
लवकरात लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगितले तसेच पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन
शंकर जाधव –
कल्याण (kalyan) पूर्व येथील चिंचपाडा ते नांदीवली जिजाऊ वसाहत या परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई ची समस्या भेडसावत आहेत या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.पाणी पाणी टंचाईची दखल घेत शुक्रवारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नांदिवली चिंचपाडा परिसरातील जिजाऊ वसाहतीचा दौरा करून लोकांना होत असलेल्या पाणीटंचाई तसेच इतर समस्या जाणून घेतल्या. यावेळी महेश गायकवाड यांनी तात्काळ पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांना फोन करून प्रभागात बोलवून घेतले. यावेळी महेश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणी समस्येबाबत जाब विचारला. यावेळी पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांनी लवकरात लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगितले तसेच पुढील दोन दिवसांत टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिले आहे.