आरोग्य

Sharavan Fast : श्रावणात उपवास करताय ? या आहाराचा नक्की करा समावेश

जी लोकं उपवास करतात त्यांनी या दिवसात खाण्या-पिण्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं?

श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे. भगवान शिवाची या महिन्यात आराधना केली जाते आणि लोक दर सोमवारी उपवास करतात. या दिवसांमध्ये लोक सात्विक आहार घेतात. जी लोकं उपवास करतात त्यांनी या दिवसात खाण्या-पिण्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं? याबद्धल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.

1) साबूदाना
Shravan 2024: उपवासाच्या दिवसांमध्ये लोक साबूदाना आवर्जून खातात. साबूदान्यामध्ये भरूर फायबर असतं आणि इतरही आवश्यक पोषक तत्व असतात. ज्यामुळे साबूदाना एक पौष्टिक आहार ठरतो. साबूदान्याची वडे किंवा खिचडी बनवून खाऊ शकता. हा एक हेल्दी आहार ठरेल आणि तुमचं पोटही चांगलं राहील.

२) ड्राय फ्रूट्स
सर्वांच्याच घरामध्ये ड्रायफ्रूट्स असतात त्यामुळे घरातील मोठे लोक रोज मुठभर ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. या पवित्र महिन्यातसुद्धा तुम्ही असं करून हेल्दी राहू शकता. यात अनेक मिनरल्स, व्हिटॅमिन्स, आणि पोषक तत्व असतात. दिवसा तुम्ही हे कोणत्याही वेळी खाऊ शकता. ड्राय फ्रूट्स हे एक चांगलं नाश्ता ठरू शकतात. बदाम, काजू, पिस्ता एकत्र करून खाऊ शकता.

३) फळं
श्रवणामध्ये तुम्ही वेगवेगळी फळं खाऊ शकता. या दिवसात अनेक फळं बाजारात उपलब्ध असतात. या दिवसात काही फळं खाल्ली तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. केळी, सफरचंद, पपई, नाशपाती या फळांचं सेवन तुम्ही करू शकता. याने पोट तर चांगलं राहीलच सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतील.

4) खोबरं
या दिवसामध्ये तुमच्या आहारात खोबऱ्याचा समावेश करायला हवा. आरोग्याला याने वेगवेगळे फायदे मिळतात. खोबऱ्याचा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये समावेश करून सेवन करू शकता. याने बनवलेल्या पदार्थांची टेस्टही वाढते.

5) शेंगदाणे
शेगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ज्याच्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात. शेंगदाण्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भूकसुद्धा कमी लागते. शेंगदाण्याच्या सेवनाने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, शेंगदाण्याचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त शेंगदाणे खाल्ले तर मळमळ होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *